येरमाळा येथे ब्रह्मकुमारीज सेवाकेंद्रावर भव्य स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न
येरमाळा प्रतिनिधी नितीन बारकुल
कळंब तालुक्यातील येरमाळा येथे ब्रह्मकुमारीज सेवा केंद्रावर भव्य स्नेह मिलन कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला या कार्यक्रमांमध्ये 40 हूण अधिक समर्पित ब्रह्मकुमारी भगिनींनी आपला सहभाग नोंदवला व सर्व येरमाळा ग्रामस्थांनी पण आपली हजेरी लावली तसेच गावामध्ये भव्य शोभायात्रा ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली तसेच गावातील रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळी काढून फुले टाकून ब्रह्मकुमारी यांचे औक्षण करून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले.
सोलापूरहून आलेल्या सब जॉन इन्चार्ज सोमप्रभा दिदिनी सभेला संबोधित करत सांगितले की येरमाळा गावामध्ये मूल्य शिक्षणाचे हे कार्य असेच उन्नती करू ह्या स्नेहमिलनाचा मुख्य हेतू जनतेला प्रेम, भाईचारा, सद्भावना शिकवण्याचा होता असे त्यांच्या शुभेच्छा रुपी शब्दात त्यांनी सांगितले.
केंद्रप्रभारी बी.के. वैजनाथ भाईजींनी सर्वांचे कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याबद्दल आभार व्यक्त केले तीनशेहून अधिक साधकांनी आपला सहभाग नोंदवला व सर्वांनी प्रसाद ग्रहण करून प्रस्थान केले.
Comments
Post a Comment