परभणी येथिल विटंबनेचा येरमाळा येथे निषेध

परभणी येथिल विटंबनेचा निषेध 

पुज्य नगरी . ऑनलाईन न्यूज 
प्रतिनिधी नितीन बारकुल 

परभणी येथील संविधान शिल्प                              प्रतिकृती विटंबन आणि 
मस्सा जोग येतील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुन हत्या च्या निषेधार्थ येरमाळा परिसरातील  भीमसैनिक येरमाळा गावातील संविधान प्रेमी जनतेच्या वतीने  घटनेच्या निषेधार्थ 
येरमाळा पोलीस ठाणे  द्वारा  मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले ,
 
 कळंब तालुक्यातील येरमाळा व येरमाळा परिसरातील अनेक गावातील भीमसैनिकानी येरमाळा पोलीस ठाणेद्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन  देऊन शांततेच्या मार्गाने निषेध नोंदविला परभणी मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधान शिल्प प्रतिकृतीचे विटंबन करण्यात आले, त्या निषेधार्थ परभणी मधील समाज बांधवांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या, त्याला सरकार जबाबदार असून प्रत्येक महापुरुषाच्या पुतळ्यांना संरक्षण दिल्यास विटंबल सारखी कृती घडणार नाही, परंतु परभणी येथील समाज बांधवांवर लाठीचार्ज अमानुष अत्याचार कोंबिंग ऑपरेशनच्या दरम्यान पोलीस प्रशासनाकडून होत आहे त 
 माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी गृहमंत्र्याला आदेश देऊन तात्काळ कॉम्बिग ऑपरेशन थांबवावे व आंबेडकरी जनतेच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा  तसेच मस्सा जोग येतील सरपंच संतोष देशमुख यांची झाली निर्गुण हत्या याचा तपास सीआयडी खात्याकडे वर्ग करावा व कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देता महाराष्ट्राला शांतता बहाल करावी वरील सर्व घडलेल्या घटना निषेधार्थ असून आम्ही सर्व संविधान प्रेमी बांधव सर्व गोष्टीचा जाहीर निषेध करत आहोत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालून कोंबिंग ऑपरेशन थांबावे सर्व भीमसैनिकावरील गुन्हे मागे घ्यावेत समाजाच्या  भावनेचा आदर करावा मस्सा जोग  येतील सरपंचाच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची कृपा करावी संबंधित व्यक्तीला कठोर शिक्षा द्यावी व तात्काळ अटक करावी व सर्व तपास सीआयडी खात्याकडे वर्ग करण्यात यावा जबाबदार व्यक्तीस कडक शासन करण्यात यावे  अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा कडक इशारा देत आहोत प्रसंगी मलकापूर,साप नाई,उपळाई,वडगाव( ज )शेलगाव( दि ),रत्नापूर, येरमाळा कडकनाथवाडी,पानगाव,चोराखळी, शेलगाव(त ), तेरखेडा उंबरा, दहिफळ, भोसा, वानेवाडी, बारातेवाडी, परतापुर, या गावातील कुंदन वाघमारे, दत्ता कस्पटे, बाळासाहेब चंदनशिवे (पत्रकार), उमेश भालेराव, विनोद पायाळ, दीपक वाघमारे, मधुकर पायाळ , रविकांत पायाळ, फकीर ओव्हाळ, तेजस ओव्हाळ,  पोपट ओव्हाळ, राजेंद्र ओव्हाळ, सचिन ओव्हाळ, देवानंद बारकुल, सुनील शीलवंत, निशांत कांबळे, अशोक कसबे, पवन जगताप, डॉ. संदीप तांबारे, अजेंद्र शामकुळे, मारुती वाघमारे, दशरथ पायाळ, राहुल चंदनशिवे, आर्यन वाघमारे, शंकर वाघमारे, सम्राट वाघमारे, बबन कांबळे, पांडुरंग मते( पत्रकार )महादेव शिंदे, कुंदन कांबळे, इत्यादी बहुसंख्य वरील गावातील भीमसैनिका ने सदरील घटनेचे निषेधार्थ येरमाळा पोलीस ठाणे द्वारे स्वाक्षऱ्या करून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ चे अनुदान DBT पोर्टल द्वारे होणार , कागपपत्र जमा करण्याचे अवाहन