पीडीईएच्या इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा आकुर्डी येथे कला व विज्ञान प्रदर्शन

पीडीईएच्या इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा आकुर्डी येथे कला व विज्ञान प्रदर्शन

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज

 पुणे आकुर्डी, डिसेंबर : पीडीईएच्या इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलने कला व विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या सर्जनशील कलागुणांचे दर्शन घडवले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या कलात्मक आणि वैज्ञानिक कौशल्यावर प्रकाश टाकणाऱ्या जीवंत रांगोळी प्रदर्शनासह ५० नाविन्यपूर्ण प्रकल्पकां चा समावेश होता. प्रसिद्ध गायक, चित्रपट निर्माते आणि माजी सॉफ्टवेअर इंजिनीअर सव्यसाची चतुर्वेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या प्रदर्शनामुळे सर्वांगीण विकासाला चालना मिळते, कलात्मक आणि वैज्ञानिक कलांना वाव मिळतो, असे प्राचार्यांनी सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्सला प्रोत्साहन मिळते आणि त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी तयार केले जाते.

नवीकरणीय ऊर्जा, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केले. या प्रदर्शनामुळे युवा नवउद्योजकांना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी आणि तज्ज्ञांशी संवाद साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले.

सर्जनशीलता, नावीन्य आणि शैक्षणिक उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणे हे शाळेचे उद्दीष्ट आहे.

Comments

Popular posts from this blog

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ चे अनुदान DBT पोर्टल द्वारे होणार , कागपपत्र जमा करण्याचे अवाहन