फोन-पे वर चुकून गेलेले पैसे परत मिळाले

फोन-पे वर चुकून गेलेले पैसे परत मिळाले 

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 

येरमाळा प्रतिनिधी नितीन बारकुल 

येरमाळा ता कळंब येथील खवा व्यावसायिक किरण बारकुल यांच्याकडून दुसऱ्याच्या फोनपेवर चाळीस हजार एवढी रक्कम चुकून गेली ही बाब लक्षात आल्यावर चुकून रक्कम गेलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क साधला असता पुढे कॉल उचलत जात नव्हता ट्रू कॉलर वर त्या नंबर विषयी माहिती घेतल्यावर विद्या कुरेवार यांच्या अकाउंट वर पैसे गेल्याचे लक्षात आले भारतीय स्टेट बँकेचे मॅनेजर यांच्याशी संपर्क साधून विनंती केली असता त्यांनी हे अकाउंट चंद्रपूर येथील महाराष्ट्र बँक येथील आहे अशी माहिती दिली आणि चंद्रपूर येथील महाराष्ट्र बँकेला मेल केला आणि संभाजीनगर येथील सचिन मोरे हे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत त्यांनाही संपर्क साधला मग समोरील व्यक्तीचे अकाउंट होल्ड करून जवळपास एक महिन्या पाठपुरावा केल्यामुळे चुकून गेलेले 40 हजार रुपये वापस मिळाले यात महाराष्ट्र बँकेचे मॅनेजर सचिन मोरे व भारतीय स्टेट बँकेचे मॅनेजर महेंद्र भोर साहेब यांचे सहकार्य लाभले म्हणून चुकून गेलेले 40 हजार रुपये येरमाळा येथील खवा व्यवसायिक किरण बारकुल यांना वापस मिळाले.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न