येरमाळा ग्रामपंचायत च्या सरपंच पदी सौ प्रिया विशाल बारकुल यांची निवड
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
येरमाळा प्रतिनिधी नितीन बारकुल
येरमाळा ता कळंब येथील ग्रामपंचायत सरपंच पदी सौ प्रिया विशाल बारकुल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते निवडीबद्दल त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी कार्यक्रमाला मा सभापती विकास भाऊ बारकुल, मंडळ अधिकारी नागटिळक साहेब, तलाठी, ग्रामसेवक, उपसरपंच गणेश बारकुल व माजी सरपंच मंदाकिनी बारकुल, सुजाता श्रीकांत देशमुख, नसरीमा सय्यद व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील मान्यवर, कार्यकर्ते, पत्रकार उपस्थित होते यावेळी विकास भाऊ बारकुल यांनी येरमाळा गावात सुरू असलेल्या विविध विकास कामाची माहिती दिली व यापुढेही गावातील अपूर्ण सर्व कामे येणाऱ्या वर्षभरात पूर्णत्वास नेहली जातील असे आश्वासित केले तसेच सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने जोमाने काम करावे असे आव्हान केले, कार्यक्रमाच्या प्रास्ताविक प्रसंगी बोलताना गणेश बाबा बारकुल यांनी गावातील लोकांनी आपले प्रश्न समस्या अडचणी घेऊन ग्रामपंचायत सोबत वारंवार संपर्क साधावा व आपली कामे करून घ्यावीत व मोठ्या संख्येने ग्रामसभेला ही उपस्थित राहावे असे आव्हान केले तर आभार मदन बारकुल यांनी मांनले यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
Comments
Post a Comment