ज्ञानोद्योग विद्यालय येरमाळा येथे स्वयंशासन दिन उत्साहात साजरा
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
येरमाळा प्रतिनिधी नितीन बारकुल
येरमाळा ता कळंब येथील ज्ञानद्योग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या वेशभूषेत सकाळच्या प्रार्थने पासून ते पूर्ण दिवस शाळेचे कामकाज दहावीच्या विद्यार्थ्यांनी पाहिले तसेच दुपारनंतर विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम ही आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्ञान प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री आबासाहेब बारकुल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब बारकुल प्रमुख पाहुणे म्हणून राजश्री शाहू महाविद्यालय लातूर येथील डिके देशमुख सर भारतीय स्टेट बँकेचे मॅनेजर महेंद्र बोर साहेब विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एल पोळ सर पत्रकार बालाजी बारकुल उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले तसेच स्वागत गीत वैष्णवी, अमृता, गौरी या विद्यार्थिनींनी सादर केले, सर्व कार्यक्रमाचे नियोजन दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केले होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सई गायकवाड तर प्रस्ताविक मुख्याध्यापक अनुष्का बारकुल या विद्यार्थिनीने केले तसेच विद्यार्थिनी शिक्षणाधिकारी म्हणून विभावरी जाधव, सुजाता पवार, सई गायकवाड, अमृता चव्हाण, इत्यादी विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून शिक्षका विषयी व शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना भारतीय स्टेट बँकेचे शाखा अधिकारी महेंद्र भोर साहेब यांनी शाळेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर करून शाळेसाठी लाईटची सोय कायमस्वरूपी करून दिली म्हणून विद्यार्थी व शाळेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला व त्यांनीही आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांसाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर डी के देशमुख सर राजश्री शाहू महाविद्यालय लातूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर विचार मांडले तसेच दहावीनंतर राजश्री शाहू महाविद्यालय लातूर येथे अकरावी ला प्रवेश घेण्यासाठी 23 मार्च ला (स्क्रीनिंग टेस्ट) पूर्व परीक्षा असते व नंतर दहावीला मेरिटमध्ये मार्क घेऊनही कॉलेजला प्रवेश मिळतो असे यावेळी डी के देशमुख सरांनी सांगितले व विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या
यावेळी कार्यक्रमाला मुख्याध्यापक पौळ सर, शिंदे सर, पेजगुडे सर, अमर बारकूल सर, चांदणे सर, शिरसट मॅडम, गोसावी मॅडम, शरद बारकुल सर, धनंजय बारकुल सर, व इतर शिक्षक व स्टाफ उपस्थित होता
Comments
Post a Comment