पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु. कॉलेज, आकुर्डी शाखेला 'वनराई इको क्लब' पर्यावरण उपक्रमांमध्ये घवघवीत यश

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु. कॉलेज, आकुर्डी शाखेला 'वनराई इको क्लब' पर्यावरण उपक्रमांमध्ये घवघवीत यश

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज

पुणे, आकुर्डी (ता.१५) : वनराई संस्थेचे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री, पद्मविभूषण डॉ.मोहन धारिया यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर 'वनराई इको क्लब पर्यावरण शिक्षण' उपक्रमांमध्ये पर्यावरण विषयक गाणी, कविता, चित्रकला आणि नाट्य स्पर्धा आदी स्पर्धांचे आयोजन निळू फुले सभागृह, पुणे येथे करण्यात आले होते. 
          यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लिट्ल चॅम्प फेम गायिका अंजली गायकवाड, वनराई चे विश्वस्त डॉ. रोहिदास मोरे, सागर धारिया, वनराईचे सचिव अमित वाडेकर, बबनराव कानकिरड आदी उपस्थित होते.
            पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल ज्यु. कॉलेज, आकुर्डी या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. या अंतर्गत झालेल्या समूह गायन, चित्रकला, नाट्य, निबंध लेखन, प्रकल्प आदी स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरण करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला व पर्यावरण रक्षणाप्रती असलेली जागरूकता दाखवून दिली. या उपक्रमात ५० शाळांमधील ४००  
विद्यार्थी सहभागी झाले होते. आंतरशालेय पर्यावरण नाट्य स्पर्धेमध्ये पीडीईए च्या आकुर्डी या शाखेने 'आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे' हे नाटक अत्यंत प्रभावीपणे सादर केले व प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले, त्याचबरोबर विद्यालयास 'वनराई हरित शाळा' म्हणून प्रोत्साहन पर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे यांना, विद्यालयामध्ये वनराई पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंतर्गत नाविन्यपूर्ण पर्यावरण शिक्षण पद्धती राबवल्याबद्दल 'सर्वोत्कृष्ट पर्यावरण शिक्षण अध्यापक' या पुरस्काराने गौरविण्यात आले. 
                कार्यक्रमा दरम्यान प्रमुख पाहुण्यांनी देखील पर्यावरण रक्षण ही काळाची गरज ठरलेली असून, त्यासाठी जनजागृतीचा वसा व वारसा शालेय विद्यार्थ्यांनी पुढे चालवावा असा संदेश दिला.
              सर्व विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व विजयी स्पर्धकांचे विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्याकडून कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ चे अनुदान DBT पोर्टल द्वारे होणार , कागपपत्र जमा करण्याचे अवाहन