कब बुलबुल, स्काऊट- गाईड धाराशिव जिल्हा मेळावा येरमाळा येथे उत्साहात सुरू.

कब बुलबुल, स्काऊट- गाईड धाराशिव  जिल्हा मेळावा येरमाळा येथे उत्साहात सुरू.

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज

येरमाळा प्रतिनिधी नितीन बारकुल 

 धाराशिव भारत स्काऊट आणि गाईड चा जिल्हा मेळावा येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव या ठिकाणी दिनांक:-06 ते  08 या कालावधीत विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूल येरमाळा येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून कब बुलबुल, स्काऊट गाईड मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. या मेळाव्यात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. यामध्ये लोकनृत्य, समूह गीत, तंबू सजावट, बिन भांड्याचा स्वयंपाक, संचलन स्पर्धा, शारीरिक प्रात्यक्षिके, हस्तकला, प्रश्नमंजुषा, भव्य शेकोटी स्पर्धा, शोभायात्रा इत्यादी मनोरंजनात्मक स्पर्धा घेतल्या जातात. जागतिक पातळीवर विद्यार्थ्यांना शिस्त लावणारी संस्था म्हणून भारत स्काऊट आणि गाईड ही संस्था कार्य करते. या मेळाव्याचे उद्घाटन दिनांक 06 गुरुवार रोजी धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक जि प धाराशिव श्री अशोक पाटील साहेब, जिल्हा आयुक्त गाईड तथा शिक्षणाधिकारी माध्यमिक जि प धाराशिव श्रीमती सुधा साळुंखे मॅडम , जिल्हा संघटक स्काऊट श्री विक्रांत देशपांडे, जिल्हा चिटणीस तथा उपशिक्षणाधिकारी माध्यमिक श्री दत्तात्रेय लांडगे साहेब, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड श्रीमती सविता पांढरे, जिल्हा सहचिटणीस श्रीमती उषा सर्जे, शिक्षण विभागातील सर्व अधिकारी वर्ग  व संस्थापक अध्यक्ष विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूल येरमाळाचे श्री सचिन पाटील उपस्थित होते. यावेळी लॉर्ड बेडन पॉवेल, लेडी बेडन पॉवेल, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून रीतसर उद्घाटन करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर घोष यांनी विद्यार्थ्यांची शिस्त व विविध स्पर्धांचे कौतुक केले. व त्यांनी आपल्या जीवनामध्ये असे सुसंस्कार  करणारी संस्था न लाभण्याने  खंत व्यक्त केली. त्यांनी व शिक्षण विभागातील सर्व अधिकारी यांनी स्काऊट गाईड कार्यालयाने आयोजित केलेल्या मेळाव्याची पाहणी करून समाधान व्यक्त केले. डायटचे प्राचार्य श्री जटनुरे साहेब यांनी दरवर्षी अशा मेळाव्यात एक थीम घेऊन समाज उपयोगी कार्य करावे अशी भावना व्यक्त केली. रात्री विद्यार्थ्यांनी लोकनृत्य स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपली कला सादर केली. यावेळी शिक्षणाधिकारी अशोक पाटील साहेब, विस्तार अधिकारी श्री जंगम  साहेब  उपस्थित होते. विस्ताराधिकारी श्री जगम साहेब यांनी स्वतः एक गीत सादर केले. दिवसाचा शेवट सन्मान सभेने रात्री अकरा वाजता करण्यात आला. दिनांक:-07 शुक्रवार रोजी सकाळी सात वाजता सर्व धर्मीय प्रार्थना होऊन सदर  मेळाव्याची सुरुवात झाली जिल्ह्यातील विद्यार्थी दिवसभर विविध स्पर्धेमध्ये आनंदाने सहभागी झाल्याचे दिसले. या मेळाव्याचा शेवट दिनांक :-08 शनिवार रोजी शोभायात्रा काढून व बक्षीस वितरणाने  होणार आहे.
 या मेळाव्यासाठी दिनांक:-03 पासून जिल्हा संघटक विक्रांत देशपांडे सर यांच्या नेतृत्वाखाली ॲडव्हान्स पार्टीतील सदस्य पोतदार सर, धोंगडे सर, माने सर, खामकर सर, सविता पांढरे मॅडम, शुभांगी पाटील मॅडम, दिलीप चौधरी सर, जयपाल शेरखाने सर स्काऊट गाईड कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक परमेश्वर बनसोडे, कनिष्ठ लिपिक सलीम शेख व सेवक दत्तात्रय माने यांनी अविश्रांत परिश्रम करून सदर जिल्हा मेळाव्याची जय्यत तयारी केली आहे.या कामी विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूल येरमाळाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य श्री सचिन पाटील सर व   संस्थेच्या अध्यक्ष प्रभावती पाटील संचालिका सौ.स्वाती पाटील मॅडम विद्यानिकेतन प्राथमिक स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.वर्षा पवार मॅडम, विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका सौ प्रियंका काकडे मॅडम, विद्यानिकेतन वस्तीगृहाचे अधीक्षक श्री डोके सर  शिक्षक बावकर मॅडम व गायकवाड मॅडम व वसतिगृहातील मुलांनी   मोलाचे  सहकार्य केले. या मेळाव्यात जिल्ह्यातील एकूण  विद्यार्थी कब बुलबुल  300, स्काऊट गाईडचे 700 विद्यार्थी व विद्यानिकेतन चे 1000 विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवलेला आहे. हे विद्यार्थी विद्यानिकेतनच्या परिसरामध्ये तंबू  मध्ये रहिवास करतात, उपलब्ध परिस्थितीचा सामना करून तीन दिवस खेळीमेळीने  एकत्र राहतात, विविध स्पर्धेत भाग येतात यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाडू वृत्ती  निर्माण होण्यास मदत होते. तरी अशा दिमागदार जिल्हा मेळाव्याचा लाभ येरमाळा परिसरातील व जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन श्री विक्रांत देशपांडे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न