लायन्स क्लब इंटरनॅशनल झोन चेअर पर्सन प्रीती बोंडे यांच्याकडून 25 महिला शिक्षकांचा सन्मान
महिला दिन विशेष: लायन्स क्लब इंटरनॅशनल झोन चेअर पर्सन प्रीती बोंडे यांच्याकडून 25 महिला शिक्षकांचा सन्मान
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
पुणे
*लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल झोन चेअरपर्सन लायन प्रीती बोंडे यांच्या संकल्पनेतून PDEA’s English Medium Secondary School and Jr. College, Akurdi, Pune येथील २५ महिला शिक्षकांचा सन्मान करण्यात आला*.
महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिक्षिका केवळ ज्ञानदानाचे कार्य करत नाहीत, तर घर आणि शाळा या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळतात. त्यांच्या दररोजच्या धावपळीतील दिवसात स्वतःसाठी थोडा आनंद मिळावा, त्यांच्या भावना समजून त्यांना वेळ द्यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
कार्यक्रमात विविध गेम्सचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि आनंदाने खेळाचा अनुभव घेतला. स्पर्धांमध्ये विजयी झालेल्यांसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची बक्षीसे, तसेच सर्व सहभागी शिक्षकांना मेडल्स देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रिन्सिपल सौ. प्रीती दबडे यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या समर्थनाबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानते – असे लायन प्रीती बोंडे यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी ट्रॉफी आणि मेडल्स लायन प्रीती बोंडे यांनी स्वतः स्पॉन्सर केल्या, हे विशेष उल्लेखनीय आहे.
कार्यक्रमाच्या वेळी झोन रिजन चेअरपर्सन शैलेजाताई सांगळे, झोन चेअरपर्सन मीनांजलीताई मोहिते, भोसरी क्लबच्या प्रेसिडेंट मनीषा माने, तसेच लायन डॉ. शितल मोरे, प्रणिता हिंगणे, वनश्री तुरखडे, सोनाली तुरखडे, लायन सीमा पारेख यांचीही उपस्थिती लाभली.
शिक्षकांनी हा दिवस खूप आनंदात साजरा केला, कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला, आणि त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच या उपक्रमाचे यश आहे!
Comments
Post a Comment