तितिक्षा इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या विद्यमाने पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु. कॉलेज, आकुर्डीमध्ये 'मराठी राजभाषा दिन' उत्साहात संपन्न

तितिक्षा इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या विद्यमाने पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु. कॉलेज, आकुर्डीमध्ये 'मराठी राजभाषा दिन' उत्साहात संपन्न
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज

पुणे, आकुर्डी  :  पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु. कॉलेज, आकुर्डीमध्ये 'मराठी राजभाषा दिन',  तितिक्षा इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या विद्यमाने यशस्वीरित्या संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी तितिक्षा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा प्रिया दामले व त्यांचे सहकारी योगेश हरणे प्रमुख पाहुणे म्हणून व विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या शुभहस्ते सरस्वती पूजनाने झाली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार  प्राचार्या प्रिती दबडे यांच्या हस्ते करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी 'स्वरचित कविता वाचन', या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये बहुसंख्य विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. कविता लेखनातून व वाचनातून विद्यार्थ्यांनी विविध विषयांना अतिशय कल्पकतेने व प्रभावीपणे हाताळले. आई, वृक्ष, वडील, स्त्री- शक्ती, चिमणी अशा विविध विषयांना हात घालत विद्यार्थ्यांनी आपल्या भावना कवितेद्वारे व्यक्त करण्याचा प्रयत्न केला व त्यातून अनमोल असा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रिया दामले व योगेश हरणे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. या स्पर्धेमधून विजेते तीन क्रमांक काढण्यात आले, ज्यामध्ये प्रथम क्रमांक पूर्वा पवार, द्वितीय क्रमांक भुवनेश्वरी गांगुर्डे व तृतीय क्रमांक ऊर्वी नाईक यांनी पटकावला. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनी देखील स्वरचित कविता सादर केल्या. यामध्ये विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे यांनी प्रथम क्रमांक, ज्योती बोंद्रे यांनी द्वितीय क्रमांक व मीना नाचोनकर यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. सर्व विजेत्या स्पर्धकांना व शिक्षकांना प्रमाणपत्र, पुस्तक व महावस्त्र देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मराठी भाषा ओलिंपियाड या परीक्षेमध्ये विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांचे देखील पारितोषिक वितरण या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तितिक्षा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वतीने पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुण्यांनी देखील काही मनोरंजक कविता विद्यार्थ्यांसमोर सादर केल्या व मराठी साहित्य किती समृद्ध आहे याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. विद्यार्थ्यांनी देखील सर्व कवितांचा मनमुराद आनंद लुटला. अशाप्रकारे 'मराठी राजभाषा दिन' आनंदी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्योती बोंद्रे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न