नागरी सेवा क्रीडा स्पर्धेत दयानंद बिडवे यांना रौप्य पदक

नागरी सेवा क्रीडा स्पर्धेत दयानंद बिडवे यांना रौप्य पदक

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी नितीन बारकुल 
पुणे : भारत सरकारच्या अखत्यारीतील नागरी क्रीडा सेवा अंतर्गत चंदिगडमधील क्रीडा स्टेडियममध्ये 5 ते 8 मार्च 2025 या कालावधीत पार पडलेल्या अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा स्पर्धेमध्ये राज्य कर (जीएसटी) अधिकारी दयानंद बिडवे यांनी योगासने या क्रीडा प्रकारात महाराष्ट्राचे नेतृत्व करताना 25 राज्यातील स्पर्धकांमधून राष्ट्रीय स्तरावरील कांस्य पदक पटकावले. 

दयानंद बिडवे हे वस्तू व सेवाकर कार्यालय, पुणे येथे राज्य कर (जीएसटी) अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांचे शालेय शिक्षण ज्ञानोद्योग विद्यालय, येरमाळा व शासकीय विद्यानिकेतन, छत्रपती संभाजीनगरमध्ये झाले. लातूरमध्ये उच्च शिक्षण घेतल्यानंतर विक्रीकर विभागामध्ये त्यांची निवड झाली. त्यांचे बंधूही तहसीलदारपदी छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहेत. दयानंद बिडवे यांनी योगशास्त्र या विषयात पदविका व पदवी संपादन केली आहे. राष्ट्रीय स्तरावर 25 राज्यांतून आलेल्या खेळाडूंमधून द्वितीय क्रमांक मिळवत रौप्य ( सिल्वर ) पदक पटकावले.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न