श्री येडेश्वरी देवी चैत्र यात्रा महोत्सवाची जय्यत तयारी 12 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान यात्रा

श्री येडेश्वरी देवी चैत्र यात्रा महोत्सवाची जय्यत तयारी 
12 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान यात्रा 
13 एप्रिल रोजी चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्र

येरमाळा प्रतिनिधी ( नितीन बारकुल )

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 

धाराशिव जिल्ह्यातील आई तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून सुप्रसिद्ध असलेली कळंब तालुक्यातील येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीची चैत्र पोर्णिमा यात्रा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून येडेश्वरी देवस्थान ट्रस्ट व येरमाळा ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांकडून कडून जोरदार तयारी होत आहे. मुंबई, पुणे, महाराष्ट्रासह अनेक राज्यातून देवीचे भक्त मोठ्या प्रमाणात 12 एप्रिल रोजी येरमाळ्यात दाखल होतात व 13 एप्रिल रोजी यात्रेतील मुख्य कार्यक्रम चुना वेचण्याचा होत असून आलेल्या भाविक भक्तांच्या सोयीसाठी येरमाळा ग्रामपंचायत तसेच येडेश्वरी देवस्थान ट्रस्ट व गावकरी, देवीचे भाविक भक्त, व्यावसायिक यांच्याकडून जोरदार तयारी सुरू असून येरमाळा नगरीमध्ये विविध व्यवसायासह भाविक भक्तांचा ओघ वाढत आहे तसेच यावर्षी यात्रा महोत्सवात छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित सुप्रसिद्ध छावा चित्रपट ही यात्रेकरूंना पाहण्यासाठी उपलब्ध झालेला आहे. तसेच भाविकांच्या सोयीसाठी व उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे डोंगरावरील मुख्य मंदिराकडे व आमराईतील पालखी मंदिराकडे ही दर्शन रांगेवर भव्य मंडपाचे ही आयोजन करण्यात आले आहे तसेच यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही म्हणून पोलीस प्रशासन ही सज्ज असून चोक नियोजन करत आहेत, तसेच महसूल प्रशासन, महावितरण, आरोग्य विभाग व इतर विभाग ही यात्रेच्या अनुषंगाने भाविकांच्या दृष्टीने योग्य ते उपाययोजना व नियोजन करत आहेत प्रतिवर्षीच्या तुलनेत यंदा यात्रा मोठ्या प्रमाणात भरणार असे दिसून येत आहे. येरमाळा तसेच परिसरातील शेतकरी वर्गाने ही यात्रेच्या दृष्टीने आपल्या शेतातील सुगीची कामे उरकून घेतली आहेत, तसेच शेतकरी वर्ग आपापल्या विंधन विहिरीवर येणाऱ्या भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था करतात. श्री आई येडेश्वरी ची यात्रा येरमाळा पंचक्रोशी सह धाराशिव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यावसायिक दाखल होतात मंदावलेल्या अर्थव्यवस्थेत येडेश्वरी देवीची यात्रा व्यावसायिकांसाठी येडेश्वरी च्या भक्तांसाठी तसेच बच्चे कंपनी लहान मोठे थोरांसाठी एक पर्वणीच असते.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न