तितिक्षा इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या विद्यमाने पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु. कॉलेज, आकुर्डीमध्ये 'विद्यार्थ्यांचा गुणगौरव'.
तितिक्षा इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या विद्यमाने पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु. कॉलेज, आकुर्डीमध्ये 'विद्यार्थ्यांचा गुणगौरव'.
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
पुणे, आकुर्डी (ता.१८ ) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु. कॉलेज, आकुर्डीमध्ये 'शाळा व शिक्षक यांच्याबद्दल तुमचे मत' या विषयावरती निबंध स्पर्धा घेण्यात आली. त्या निबंध स्पर्धेमध्ये ज्यांनी उत्कृष्ट निबंध लिहिले होते, त्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव तितिक्षा इंटरनॅशनल फाउंडेशनतर्फे करण्यात आला. या कार्यक्रमासाठी तितिक्षा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्रिया दामले व त्यांचे सहकारी प्रसिद्ध लेखक डॉ. मधुसूदन घाणेकर प्रमुख पाहुणे म्हणून व विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातील प्रथम क्रमांकाचे बक्षीस पूर्वा पवार, अवनी नगरकर , अविका शर्मा, तनिष्का काशीद, आयुष यादव, वेदिका काजळे, सानिका मोहिते या विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.या निबंध स्पर्धेचे आयोजन विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
Comments
Post a Comment