कात्राबाद सोनगिरी ग्रा.प च्या उपसरपंच पदी गणेश कोकाटे यांची बिनविरोध निवड
,कात्राबाद सोनगिरी ग्रा.प च्या उपसरपंच पदी गणेश कोकाटे यांची बिनविरोध निवड
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
परंडा ( दि २८ )
परंडा तालूक्यातील कात्राबाद सोनगिरी ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी दि २८ एप्रिल रोजी गणेश कोकाटे यांची बिन विरोध निवड करण्यात आली आहे ,
उपसरपंच सौ निलावती गोकुळ गरड यांनी राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पदाची जागा रिक्त झाली होती ,
सरपंच सौ लक्ष्मीबाई जालिंदर कोळी यांच्या अध्यक्षतेखाली दि २८ रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या विशेष सभेत गणेश कोकाटे यांचा उपसरपंच पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदावर बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडीबद्दल ग्रामस्थांकडून गणेश कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला. सदर सभेचसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून मंडळ अधिकारी दुर्गप्पा पवार यांनी काम पाहिले. ग्रामसेवक अशोक शिंदे, तलाठी ज्ञानेश्वर गुळमिरे, विशाल खोसे यांनी काम पाहिले. यावेळी श्री राजाभाऊ शेळके, सरपंच सौ लक्ष्मीबाई कोळी, सदस्य श्री परवेज पटेल, सदस्य सौ नीलावती गरड, सदस्य सौ मंगल शेळके, विष्णू गरड, विलास गरड, राहुल गरड, परसराम कोळी, रणजीत गरड, श्रीराम देवकर, समाधान देवकर, प्रवीण गरड, अंगद भोसले, अभिमान काळे, गोकुळ गरड, लक्ष्मण वेताळ, बळीराम गरड, विजय शिनगारे, भगवान कोकाटे, सौरव गरड, सुरेश शिंदे, भास्कर कोकाटे, सोमनाथ शेळके,भगवान कोकाटे, बलभीम कोकाटे, अक्षय कोकाटे, जेजेराम गरड सौरभ कोकाटे, लक्ष्मण शेळके, अथर्व कोकाटे, दिनेश ढवळे, अण्णा बोराडे, श्रीधर गरड, आकाश गरड, कालिदास कोकाटे, हरी मोरे,उपस्थित होते..
Comments
Post a Comment