पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आकुर्डीचे एच्.एस्.सी. परीक्षेत घवघवीत यश

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 

पुणे, आकुर्डी (ता. ९ ) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,आकुर्डीचा सन २०२४-२५ यावर्षीचा एच.एस.सी. बोर्ड, कॉमर्स विभागाचा निकाल १००% लागला असून विद्यालयाने घवघवीत यश प्राप्त केले आहे. समीक्षा भाऊसाहेब म्हस्के हिने ७७.००% गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक, श्रुती बाबासाहेब म्हस्के ७६.००% गुण प्राप्त करत द्वितीय व वैष्णवी मारुती आसवले हिने ७४.६७% गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक पटकावला. विद्यालयातील एकूण ४३ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. सर्व विद्यार्थ्यांच्या यशासाठी विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे व शिक्षकांनी वेळोवेळी त्यांचे जादा तास घेऊन शंकांचे निरसन करणे, अतिरिक्त मार्गदर्शनासाठी गेस्ट लेक्चर्स ठेवणे, प्रश्नपत्रिकांचा भरपूर सराव करून घेणे अशा गोष्टी सातत्याने करून घेत विद्यार्थ्यांची प्रगती करून घेतली होती. विद्यालयाच्या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मा.सचिव संदीप कदम, उपसचिव एल. एम. पवार व इतर पदाधिकारी यांच्याकडून विद्यार्थ्यांचे, प्राचार्या प्रिती दबडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक करण्यात आले. पालकांकडूनही विद्यालयाचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न