पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आकुर्डीचा एस्.एस्.सी. परीक्षेचा निकाल १००%
पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आकुर्डीचा एस्.एस्.सी. परीक्षेचा निकाल १००%
पुज्य नगरी न्यूज पुणे
पुणे, आकुर्डी (ता.१४) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आकुर्डी या विद्यालयाचा सन २०२४-२५ या वर्षीचा एस्. एस्. सी. बोर्ड परीक्षेचा निकाल १००% लागला असून सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट गुण संपादन करत विद्यालयाचे व संस्थेचे नावलौकिक वाढवले आहे.
...........................................................
............................................................
...........................................................
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षी इयत्ता दहावीचे एकूण ८२ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ५० विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये पास झालेले आहेत. तसेच १३ विद्यार्थ्यांनी ९०% च्या पुढे गुण प्राप्त केले आहेत. विद्यालयाच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब असल्याने प्राचार्या प्रिती दबडे यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले आहे. सर्व विद्यार्थ्यांमधून श्रावणी दीपक लाड हिने ९५.४० % गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक पटकावला. प्रथम मधुकर राठोड व ईश्वरी महेश इंदलकर या दोघांनीही ९४.४०% गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांक मिळवला. तनिष्का अमित पांढारकर हिने देखील ९४.००% गुण प्राप्त करत तृतीय स्थान मिळविले. तसेच नरेश पुनाराम चौधरी याने ९३.६०% व शिवानी महादेव लोकरे हिने ९३.००% गुण प्राप्त करत अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळवला आहे. एकंदरीतच विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण प्राप्त करत यश संपादन केले आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रगती करून घेण्यासाठी विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे व सर्व विषय शिक्षकांनी वर्षभर विद्यार्थ्यांवर विविध प्रकारे मेहनत घेत त्यांची तयारी करून घेतली होती. ज्यादा तास घेणे, विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे, गेस्ट लेक्चर ठेवणे, प्रश्नपत्रिकांचा भरपूर सराव करून घेणे, अशा प्रकारे विविध गोष्टी राबवण्यात आल्या होत्या. विद्यालयाच्या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मा.सचिव ॲड. संदीप कदम, उपसचिव एल. एम.पवार व इतर पदाधिकारी यांच्याकडून विद्यार्थ्यांचे, प्राचार्या प्रिती दबडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक करण्यात येत आहे. पालकांकडूनही विद्यालयाचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment