येरमाळा येथे एसएससी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

येरमाळा येथे  एसएससी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 

येरमाळा प्रतिनिधी नितीन बारकुल 

येरमाळा ( दि १७ )  येथील आजी-माजी सैनिक संघटना व येडेश्वरी कोचिंग क्लासेस च्या वतीने दि १७ मे रोजी  एसएससी 2025 उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शाल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

 कार्यक्रमाचे उद्घाटन श्री आई येडेश्वरी देवीचे प्रतिमा व शहीद जवान शंकर बारकुल यांच्या प्रतिमा पूजनाने झाले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सैनिक अनिल तात्या पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.गुळवे सर, विनोद गादेकर  तसेच ज्ञानद्योग विद्यालयाचे प्राचार्य एस एल पौळ , उपप्राचार्य सुनील पाटील, सहकार निबंधक  कुमार साहेब बारकुल, समाधान बेदरे सर, माजी पं स सभापती विकास बारकुल, सरपंच प्रिया विशाल बारकुल, उपसरपंच गणेश बारकुल, मराठी पत्रकार संघ अध्यक्ष लहू बारकुल, शिवसेना विभाग प्रमुख राहुल पाटील, प्रा संतोष तौर, मदन बारकुल मा सैनिक मनोज बारकुल, लिंबराज कोकाटे, फुलचंद कागदे,नागनाथ बारकुल,रशीद भाई शेख, अल्लाउद्दीन मेजर, युवराज शिंदे,संजय बारकुल व गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते. 
येरमाळा येथील येडेश्वरी क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी एसएससी परीक्षा 2025 च्या निकालात प्रा संतोष आगलावे सर यांच्या मार्गदर्शनाखाली घवघवीत यश संपादन केले येडेश्वरी क्लासेस मधून बारकुल सानवी सुखदेव 98.00% मार्क घेऊन प्रथम क्रमांक मिळवला तसेच द्वितीय क्रमांक जाधव अंतरा संतोष 97.20% तृतीय क्रमांक बारकुल सानवी किरण96.60%, बारकुल ऋतुजा संतोष-95.60%, राऊत प्राची अतिश-95.00%, जाधव विभावरी अविनाश-94.40%,  दिवाने श्रेया तानाजी-94.00%, गायकवाड सई निशिकांत-93.60%, पवार स्नेहल चंदाजी-93.20%, शेख जोया शकिल-93.00%, बारकुल अनुष्का उमेश-91.00%, बारकुल अनुष्का वसंत-90.00%, येडेश्वरी क्लासेसच्या एकूण बारा विद्यार्थिनींनी 90% च्या वर मार्क मिळवून घवघवीत यश संपादन केले व मुंडे प्रांजली, इनामदार आशिया, बारकुल अनुष्का मनोज, माडेकर प्रारब्धी, दिवाने अक्षदा, पवार सुजाता, साबळे गौरी, पायाळे दिव्या, मुंडे शिवानी, 85 टक्के च्या पुढे मार्क घेतलेल्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मान करण्यात आला तसेच येरमाळा येथील रहिवासी असलेले परंतु बाहेरगावी शिक्षणासाठी गेलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांगरकर  यांनी केले तर प्रस्ताविक प्रा संतोष आगलावे  यांनी केले तर आभार समाधान बेदरे  यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची व नागरिकांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न