दिल्ली येथे येडेश्वरी स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी कांस्यपदक मिळवले
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
येरमाळा प्रतिनिधी नितीन बारकुल
येरमाळा तालुका कळंब येथील श्री येडेश्वरी स्पोर्ट्स क्लब च्या खेळाडूंनी स्टेअर्स फाउंडेशन इंडिया तर्फे दिल्ली येथे त्यागराज स्टेडियम मध्ये 20 मे रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत येरमाळा 14 वर्षाखाली मुलांनी कास्य पदक मिळविले त्याबद्दल श्री येडेश्वरी स्पोर्ट्स क्लब येरमाळ्याचे अध्यक्ष डॉक्टर संदीप तांबारे व मंडळाचे सर्व पदाधिकारी व पंचक्रोशीतील क्रीडा शौकीन कडून खेळाडूवर शुभेच्छांचा वर्ष होत आहे,
येरमाळा येथील राजवीर पलंगे, आदित्य राऊत, परशुराम जमदाडे, ओम पवार, समर्थ बारकुल, अथर्व बारकुल, विश्वकांत गवळी, अवधेश बारकुल, सोहम बारकुल या खेळाडूंनी दिल्ली येथे कांस्य पदक मिळवले तसेच यांना प्रशिक्षक म्हणून आकाश बारकुल व सुजित गुप्ता यांनी मार्गदर्शन केले. युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकार तसेच राष्ट्रीय खेळ संवर्धन संस्था एनएसपीओ ची मान्यता असलेल्या शेअर्स फाउंडेशनच्या राष्ट्रीय स्पर्धा दिल्ली या ठिकाणी 19 ते 22 मे 2025 रोजी संपन्न झाल्या स्पर्धेचे उद्घाटन पूर्व खेळ मंत्री भारत सरकार विजय गोयल यांनी केले तसेच इंडियन ऑलिंपिक च्या अध्यक्ष पी टी उषा यांनी व्हिडिओद्वारे शुभेच्छा दिल्या या स्पर्धेमध्ये भारतातील 14 राज्यातील 22 एक खेळाडूंनी खेळामध्ये सहभाग नोंदविला महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील येरमाळ्यातील श्री येडेश्वरी स्पोर्ट्स क्लबच्या 14 वर्षाखालील मुलांनी कांस्यपदक मिळवले या सर्व मुलांना महाराष्ट्राचे मुख्य समन्वयक श्री सुनील शिंदे आणि प्रशिक्षक आकाश बारकुल, सुजित गुप्ता ,संतोष जमदाडे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले खेळातील विविध स्तरातून सर्वांचे कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment