विविध गुन्हयातील आरोपींचा तपास लावण्यात येरमाळा पोलिसांना यश
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
येरमाळा प्रतिनिधी नितिन बारकुल
कळंब तालुक्यातील येरमाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दाखल विविध चोरीच्या गुन्ह्यातील तपासात आरोपींना पकडण्यात येरमाळा येथील पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक संग्राम भालेराव मार्गदर्शनाखाली यश मिळाले आहे.
येरमाळा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एकूण 38 गावांचा समावेश असून श्री क्षेत्र येडेश्वरी देवीच्या भाविकांची येरमाळा नगरी मध्ये बस स्टॅन्ड, चौरस्ता व मंदिर परिसरात सतत वर्दळ असते त्याच गर्दीचा फायदा घेऊन चोरटे डाव साधतात चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने तर लाखो भाविकांची वर्दळ येरमाळ्यामध्ये होत असते गर्दीचा फायदा घेऊन चोरीच्या अनेक घटना मागील दोन महिन्यात घडल्या, घडलेल्या घटनेतील अनेक आरोपीचा छडा लावण्यात येरमाळा पोलीस स्टेशनला यश आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे येरमाळा येथे दाखल गुन्हे व उघड झालेल्या माला विषयी माहिती गु ना 09/2025 मध्ये 98800 रुपयाचा मुद्यमाल जप्त करण्यात आले , यात आरोपी बबलू उर्फ राहुल अर्जुन काळे वय 28, धनाजी सुरेश शिंदे वय 21 दोघे राहणार खामकरवाडी यांना अटक करण्यात आले आहे. तसेच गुन्हा नंबर 93/2025 मध्ये तीस हजार रुपयांचा मुद्देमाल व रोहन गोविंद फड वय 26 वर्ष राहणार मूर्ती आंबेजोगाई याला अटक केली आहे. तसेच गु नं 109/2025 मध्ये 106330 रुपये मुद्देमाल व बबन काळे वय 32 वर्षे, सचिन मच्छिंद्र पवार वय 20 वर्षे राहणार जामखेड या आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच गु न 113 / 2025 मधील 76656 रुपये मुद्देमाल व आरोपी उमेश भवन काळे व 29 वर्ष राहणार कल्याण नगर भूम या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे तसेच गु नं 41/2025 मध्ये 210 लिटर डिझेल प्रकरणात सँडविच उर्फ राहुल विक्रम पवार वय 27 खामकरवाडी या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहेत,
तसेच गुन्हा नंबर 144/ 2025 मध्ये 165000 रुपयांचे सोयाबीन व आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच इतर विविध गुण्याचा तपास लावण्यात येरमाळा पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांच्या कारवाई मध्ये वरील गुन्ह्याचा तपास लावण्यात पोलीस उपनिरीक्षक संग्राम देशमुख, पीएसआय बाजीराव निंबाळकर व त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली येरमाळा पोलीस स्टेशनला यश आले आहे त्यामुळे गुन्हेगारांना येरमाळा पोलिसांचा चांगला चाप बसला आहे.
Comments
Post a Comment