कर्ज माफी सह विविध मागण्या साठी प्रहार चे शुक्रवारी परंडा येथे आंदोलन
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
परंडा दि १२ जून २०२५
परंडा ( दि १२ ) कर्ज माफी सह विविध मागण्या साठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीन शुक्रवार दि १३ जून रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे ,
विधानसभा निवडणूकी पुर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफी सह विविध अश्वासन दिले होते मात्र महायुती सरकारने त्याची अमलबजावणी केली नाही ,
जनतेची फसवणूक करणाऱ्या महायूती सरकार च्या विरोधात बच्चू कडू यांनी उपोषण सुरू केले असुन त्यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी , व विविध मागण्या साठी परंडा येथे आंदोलन करण्यात येणार आहे ,
या आंदोलनात तालूक्यातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे अवाहन प्रहार चे जिल्हा अध्यक्ष वर्षद शिंदे , जिल्हा संपर्क प्रमुख नागनाथ नरूटे पाटील तालूका अध्यक्ष आप्पासाहेब तरटे यांनी केले आहे ,
Comments
Post a Comment