परंडा येथील कुऱ्हाड गल्ली येथे पाणी पुरवठा करा अन्यथा घागर मोर्चा - शिवसेनेचा इशारा
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
परंडा ( दि १९ )
येथील कुऱ्हाड गल्ली येथे चार दिवसात पाणी पुरवठा करावा अन्यथा नगरपरिषद कार्यालया वर घागर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा ठाकरे गट शिवसेने च्या वतीने देण्यात आला आहे
गुरुवार दि १९ जून रोजी शहर प्रमुख रईस मुजावर यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कुऱ्हाड गल्ली येथे गेल्या
दोन महिन्या पासुन पाणी पुरवठा
होत नसल्याने नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे
चार दिवसात सुरळीत पाणी पुरवठा नाही झाल्यास घागर र्मोचा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी शहर प्रमुख रईस मुजावर ,मा. नगरसेवक मकरंद जोशी ,मा. नगरसेवक डॉ. अब्बास मुजावर , मजहर देहलूज , रफिक मुजावर , अभय पाटील ,गुणवंत फंड, प्रीतम डाके, राजू माळी, शुभम ऐतवाडे, सचिन जाधव, मोहन माळी, माऊली डाके, सचिन शिंदे , संतोष मेहेर , हुसेन शेख , तय्यब मुजावर , राजा पाटील , मुर्तुज सय्यद आदी उपस्थित होते .
Comments
Post a Comment