येडेश्वरी मंदिर परिसरात भाविक महिलेचे 2 लाखाचे दागिने हिसकावून चोरटे प्रसार.

येडेश्वरी मंदिर परिसरात भाविक महिलेचे 2 लाखाचे दागिने हिसकावून चोरटे प्रसार.
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 

येरमाळा प्रतिनिधी नितीन बारकुल 

कळंब तालुक्यातील येरमाळा येथील येडेश्वरी मंदिर परिसरात देवी दर्शनाला आलेल्या पुणे येथील भाविक महिलेच्या गळ्यातील २ लाख किमतीचे ५० ग्रॅम वजनाचे  दागिन्या ची चोरी करून चोरटा पसार झाला हि  घटना रविवार दिनांक २० जुलै रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे.

त्यामुळे येडेश्वरी मंदिर परिसरातील भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
 याविषयी सविस्तर वृत्त असे की रंजना पोपट जाधव, वय ६३  वर्षे, रा. बोरी ता.जुन्नरजि. पुणे या व त्यांचे बहिण येडेश्वरी मंदीरात दर्शनासाठी आल्या असता   सायंकाळ च्या सुमारास रंजना जाधव या नैसर्गिक विधीसाठी जंगलात गेल्या असता अज्ञात चोराने रंजना जाधव यांचे गळ्यातील २ लाख किमतीचे ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिन्याची चोरी करून चोरटा पसार झाला ,

 रंजना जाधव यांनी दि. २०जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 304 (2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
    त्यामुळे येडेश्वरी मंदिर परिसरात येडेश्वरी देवस्थान ट्रस्ट व पोलीस प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलण्याची मागणी येडेश्वरी भक्तातून होत आहे.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न