पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, आकुर्डी शाखा पिडीलाईट कंपनी तर्फे सिल्वर ट्रॉफीने सन्मानित

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, आकुर्डी शाखा पिडीलाईट कंपनी तर्फे सिल्वर ट्रॉफीने सन्मानित 

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 

पुणे, आकुर्डी ( ता. २८) पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, आकुर्डी शाखेला पिडीलाइईट कंपनीतर्फे शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये आर्ट अँड क्राफ्टचे जास्तीत जास्त उपक्रम झाल्यामुळे उपक्रमशील शाळा म्हणून सिल्वर ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन हॉटेल आम्बियन्स एक्सलेन्सी वाकड या ठिकाणी २८ जून रोजी करण्यात आले होते.

      वर्षभर शाळेत वेगवेगळे आर्ट अँड क्राफ्टचे उपक्रम चालू होते. त्यात राखी बनवणे, गणपती डेकोरेशन, कॅण्डल होल्डर, पाऊच पेंटिंग, क्रिसमस ट्री, काईट डेकोरेशन, फ्लॅग मेकिंग इत्यादी अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम झाले. या उपक्रमामध्ये इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. हे सर्व उपक्रम शाळेच्या प्राचार्या प्रिती दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.
     शाळेच्या प्राचार्या प्रिती दबडे व चित्रकलेच्या शिक्षिका मनीषा मोरे यांनी शाळेच्यावतीने ट्रॉफी स्वीकारली.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

ज्ञानोद्योग विद्यालय येरमाळा येथे स्वयंशासन दिन उत्साहात साजरा

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल