शेतकऱ्याच्या विहिरीवरून सोलर पंपाची ५ एचपी मोटर चोरीला
शेतकऱ्याच्या विहिरीवरून सोलर पंपाची ५ एचपी मोटर चोरीला
पुज्य नगरी ऑनलाईन
येरमाळा प्रतिनिधी नितीन बारकुल
येरमाळा परिसरातील पानगाव येथील शेतकरी आशाबाई चव्हाण यांच्या विहिरीवर बसवलेली सोलर पंपाची पाच एचपी क्षमतेची मोटर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याचा अंदाज आहे.
सदर शेतकऱ्याने सरकारी अनुदानावर सोलर पंप बसवला होता. यामुळे पाणीपुरवठ्यासाठी मुख्य आधार असलेली मोटर चोरीला गेल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेतात पिके जोमात असताना पाणी देण्याचा मार्गच बंद झाल्याने शेतीवरील संकट आणखी गडद झाले आहे.
या घटनेची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास सुरू आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वाढत असल्याने शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
Comments
Post a Comment