पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्युनिअर कॉलेज,आकुर्डी येथे विठुरायाच्या नामस्मरणात पालखी सोहळा संपन्न

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्युनिअर कॉलेज,आकुर्डी येथे विठुरायाच्या नामस्मरणात पालखी सोहळा संपन्न

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 

पुणे, आकुर्डी (ता.३०) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज,आकुर्डीमध्ये 'आषाढी एकादशी' निमित्त, पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्राच्या संत परंपरेची महती जपणारा आषाढ महिना म्हणजे, संतश्रेष्ठ श्री तुकोबाराय व संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा. हा सोहळा पीडीइएचे इंग्लिश मीडियम स्कूल, आकुर्डी येथेही प्रतिकात्मक रूपात उत्साहाने साजरा केला गेला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे व सर्व शिक्षकांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीचे प्रतिमापूजन करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोभावे पसायदान म्हटले. विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची तसेच संतांची वेशभूषा केली होती. सर्व बालवारकरी हातामध्ये पताका, पालखी, डोईवर तुळशी वृंदावन, हातामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ घेऊन टाळ- वीणेच्या गजरात विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन होत वारीमध्ये सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणातून पांडुरंगाप्रती भक्ती व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांनी अभंग-ओवी गायन, नृत्याविष्कार, पालखी परंपरेची माहिती सादर केली.  अशाप्रकारे अतिशय भक्तिमय वातावरणात चिमुकल्या वारकऱ्यांनी पालखीचा आनंद लुटला. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची महान संत परंपरा, पालखी सोहळ्याचा इतिहास व अध्यात्मिक शक्तीचे महत्व समजण्यास मदत होते. या हेतूनेच या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागाकडून करण्यात आले होते.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

ज्ञानोद्योग विद्यालय येरमाळा येथे स्वयंशासन दिन उत्साहात साजरा

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल