येरमाळा परिसरात पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी; सोयाबीन पीक धोक्यात
येरमाळा परिसरात पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी; सोयाबीन पीक धोक्यात
पुज्य नगरी न्यूज
येरमाळा प्रतिनिधी - नितिन बारकुल
धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा व परिसरात यंदा मान्सूनची अनियमितता शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. जून महिन्यात झालेल्या सुरुवातीच्या हलक्या सरींनंतर पावसाने पाठ फिरवली असून, त्यामुळे पेरण्या झालेल्या सोयाबीन पिकावर वाईट परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाल्याने मातीतील आर्द्रता कमी होऊ लागली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या पूर्ण केल्या होत्या. आता पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्यास अंकुरलेली रोपटी वाळण्याची भीती निर्माण झाली आहे, तसेच सोयाबीन वर अळीचा प्रादुर्भाव ही दिसत आहे. मे जून मध्ये पाऊस चांगला पडत असल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन च्या वेळेत पेरण्या केल्या, पण आता पाऊस नाही म्हणून पीक वाचवण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. एक-दोन दिवसात पाऊस न आल्यास पीक वाचवण्यासाठी शेतात ओलावा टिकवण्याचा शेतकऱ्यापुढे प्रश्न उभा राहिला आहे.
येरमाळा व परिसरातील शेतकरी सध्या आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. लवकरात लवकर समाधानकारक पाऊस झाला नाही, तर यंदाचे खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
Comments
Post a Comment