कर्ज माफी साठी प्रहारचा २४ रोजी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन

कर्ज माफी साठी प्रहारचा २४ रोजी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन


पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 

परंडा ( दि २३ ) शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी या सह विविध मागण्या साठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दि २४ जुलै रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार अशी माहिती जिल्हा संपर्क प्रमुख नागनाथ नरूटे पाटील यांनी दिली आहे ,

या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे अवाहन संपर्क प्रमुख नागनाथ नरुटे पाटील यांनी केले आहे ,

बुधवार दि २३ जुलै तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे परंडा येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात  सकाळी ८ ते ११ या कालावधीत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे ,

राज्य सरकारने तात्काळ निर्णय घेऊन  शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्या अशी मागणी करण्यात आली आहे 
यावेळी दयानंद बनसोडे , महाविर शिंदे , अतूल गोफणे , धर्मराज नरूटे, तुकाराम ओव्हाळ , जेजेराम कांबळे , दामू मोहरे , संजय लटके , मकबुल सय्यद , उपस्थित होते ,

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न