येरमाळा - रुग्णांच्या जीवाशी खेळ:प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब, प्रशासनाचे दुर्लक्ष

येरमाळा - रुग्णांच्या जीवाशी खेळ:
प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब, प्रशासनाचे दुर्लक्ष

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 

येरमाळा प्रतिनिधी नितिन बारकुल

येरमाळा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र हे शेकडो रुग्णांचा आधार ठरत असताना देखील केंद्राकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झाल्याने रुग्णांना गंभीर हाल सहन करावे लागत आहेत. 

पावसाळ्याच्या काळात या रस्त्यावर खड्डे, चिखल व पाण्याचे साचलेले तळे यामुळे रुग्णवाहिका व दुचाकीने तसेच पायी चालत येणाऱ्या रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, तसेच त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनाही ये जा करण्यासाठी प्रचंड त्रास होत असून, स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. काही ठिकाणी रस्ता इतका खराब झाला आहे की, रुग्णवाहिकेलाही कसरत करत मार्ग काढावा लागत आहे. परिणामी काही रुग्ण वेळेवर उपचार न मिळाल्याने गंभीर स्थितीत पोहोचत आहेत.
गावकऱ्यांनी यासंबंधी आवाज उठवून रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. जर प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत, तर ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
[] 
 
प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन दिवसात मुरूम टाकून रस्ता व्यवस्थित करण्यात येईल. ग्रामविकास अधिकारी हांडे 

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न