भारतीय स्टेट बँकेकडून मयत खातेदाराच्या कुटुंबाला वीस लाख रुपयांची अपघाती विमा रक्कम मंजूर व वाटप
भारतीय स्टेट बँकेकडून मयत खातेदाराच्या कुटुंबाला वीस लाख रुपयांची अपघाती विमा रक्कम मंजूर व वाटप
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
येरमाळा प्रतिनिधी नितीन बारकुल
सहाय्यक महाव्यवस्थापक क्षेत्रीय कार्यालय भारतीय स्टेट बँक धाराशिव सुरेश बाबू उदयगिरी , शाखा व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा येरमाळा महेंद्र भोर यांच्या प्रमुख उपस्थितीत मयत खातेदार संतोष आगलावे यांचे वारसदार बालिका संतोष आगलावे व कुटुंबीय यांना धनादेश देण्यात आला.
भारतीय स्टेट बँकेने आपल्या खातेदाराच्या अपघाती मृत्यूनंतर विमा योजनेअंतर्गत त्यांच्या कुटुंबास वीस लाख रुपयांची अपघाती विमा रक्कम मंजूर करून दिली आहे.
मयत खातेदार संतोष आगलावे यांचे झालेल्या दुर्दैवी अपघातात निधन झाले होते. त्यांचे खाते भारतीय स्टेट बँकेच्या येरमाळा शाखेत होते. त्यांनी बँकेकडून वैयक्तिक अपघात विमा काढला होता, त्यासोबत असलेल्या अपघाती विमा योजनेचा लाभ म्हणून बँकेने संबंधित कुटुंबास ही आर्थिक मदत दिली आहे.
ही रक्कम मंजूर करताना बँकेचे शाखा व्यवस्थापक महेंद्र भोर व इतर अधिकारी उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, बँकेत खातेधारकांनी विमा योजनांचा लाभ घेणे अत्यंत आवश्यक असून अशा प्रसंगी त्या योजनांची मोठी मदत होते.
मयताच्या कुटुंबीयांनी बँकेचे आभार मानले व इतर खातेदारांनीही अशा योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
Comments
Post a Comment