पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु. कॉलेज, आकुर्डी येथे गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु. कॉलेज, आकुर्डी येथे गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
पुणे, आकुर्डी (ता.१०) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु. कॉलेज, आकुर्डीमध्ये पारंपारिक पद्धतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
त्यानिमित्त विद्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे, शिक्षक व विद्यार्थी यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांचे पारंपारिक पद्धतीने औक्षण व पूजन करण्यात आले. शुभेच्छापत्र आणि पुष्प देऊन विद्यार्थ्यांकडून सर्व शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनामधील अज्ञानाचा अंधकार दूर करून त्यांना नेहमीच ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्यासाठी पथदर्शक असतात. विद्यार्थ्यांनी विविध भाषणे, नृत्य, समूहगायन आणि कवितांमधून शिक्षकांप्रती कृतज्ञता आणि जिव्हाळा व्यक्त केला. विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या मागील पौराणिक कारण समजावे, या हेतूने तसेच थोरा-मोठ्यांचा आदर करणे, अंगी विनम्रता बानविणे अशी विविध जीवनमूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याच्या हेतूने अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे नेहमीच करत असतात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी तनिष्का बिरादार आणि संस्कृती डहाले यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाने केले होते.
Comments
Post a Comment