पीडीइएचे इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, आकुर्डी येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
पीडीइएचे इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, आकुर्डी येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
पुणे ,आकुर्डी-(ता.१०)हिंदू दिनदर्शिकेनुसार आषाढ महिन्यातील शुक्लपक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केली जाते. आपल्या गुरुप्रतीचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गुरुपौर्णिमा पीडीइएच्या स्कूलमध्ये साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या सभागृहात करण्यात आले होते. सभागृहाचा मंच मुलांनी बनवलेल्या आकर्षक भेटकार्ड आणि विविध प्रकारच्या वस्तू यांनी सजवण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिती दबडे यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. गुरु विषयीची कृतज्ञता मुलांनी विविध नृत्याविष्कार आणि वकृत्व सादर करून व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मुलांनी केलेले गुरुपूजन. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक पद्धतीने गुरुपूजन केले. मुलांनी बनवलेल्या फुलांचा गुच्छ शिक्षकांना भेट म्हणून देण्यात आला. कार्यक्रमासाठी आलेल्या पालकांनाही भेटकार्ड देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचा आणखी एक वेगळा उपक्रम म्हणजे इयत्ता चौथीच्या मुलांनी बनवलेली 'ग्रॅटिट्यूड वॉल'. यासाठी मुलांनी त्यांच्या शिक्षकांविषयी भावना रंगीबेरंगी कागदावर लिहून चिटकवल्या.
या सर्व कार्यक्रमासाठी मा. मुख्याध्यापिका प्रिती दबडे यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले व आयोजन सांस्कृतिक विभागातर्फे करण्यात आले होते.
Comments
Post a Comment