दुधाळवाडी रस्ता दुरुस्तीची मागणी तीव्र; ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा, २१ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा

दुधाळवाडी रस्ता दुरुस्तीची मागणी तीव्र; ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा, २१ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 
प्रतिनिधी नितीन बारकुल 

कळंब –  तालुक्यातील दुधाळवाडी गावाकडे जाणाऱ्या NH 52 वरील दोन किलोमीटर डांबरी रस्त्याची अत्यंत खराब अवस्था झाल्याने ग्रामस्थांच्या तोंडाला आता आंदोलनाचा रस्ता धरावा लागत आहे. दररोज होणाऱ्या अपघातांमुळे आणि जीवाच्या धोका निर्माण झाल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी २१ ऑगस्ट २०२५ पासून धरणे आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

दुधाळवाडी येथील रहिवासी अमोल चंद्रकांत लाटे यांनी या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज दाखल केला असून, या अर्जात NH 52 ते दुधाळवाडी या २ किलोमीटर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांना रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

रस्त्याचे त्वरित दुरुस्तीचे काम हाती घ्या अन्यथा आंदोलन अपरिहार्य, असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, मुख्यमंत्री, पालकमंत्री, पोलीस अधीक्षक आदी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे.

ग्रामस्थांच्या या तीव्र भूमिकेमुळे प्रशासनासमोर रस्ता दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. २१ ऑगस्टपासून आंदोलनाचे पडघम वाजण्याआधी प्रशासनाने जागे होण्याची गरज आहे, अशी ग्रामस्थांची ठाम भूमिका आहे.


Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न