लहुजी शक्ती सेनेच्या महिला नेत्या मोहिनी कांबळे यांचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते समाज गौरव महिला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान.

लहुजी शक्ती सेनेच्या महिला नेत्या मोहिनी कांबळे यांचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते समाज गौरव महिला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. 


पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी नितीन बारकुल 

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे पुरस्कार वितरण सोहळा तसेच जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या कार्यक्रमास देशभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला तसेच मान्यवरांना पुरस्काराने सन्मान करण्यात आला या पुरस्कारामध्ये धाराशिव जिल्ह्यातील मौजे गौर येथील लहुजी शक्ती सेनेच्या  कळंब तालुका अध्यक्षा  मोहिनीताई कांबळे यांनी महिला सक्षमीकरण व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याची नोंद घेत त्यांची "समाज गौरव महिला" या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,

 हा पुरस्कार केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले तसेच भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष लालसिंह आर्या, राज्यसभा खासदार अनिल बोंडे, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी देशभरातून विविध राज्यातील लेखक साहित्यिक तसेच कनिष्ठ व जेष्ठ नेते कार्यकर्ते तसेच लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश महासचिव बालाजीभाऊ गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीभाऊ गायकवाड उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे केंद्रीय जयंती समितीचे अध्यक्ष विनोदजी जाधव,काकासाहेब मोरे,यांनी केले होते.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न