ऑल इंडिया संविधान आर्मी तर्फे मुंबई दादर येथे विविध प्रमुख मागण्यांसाठी राज्यव्यापी आक्रोश रेल रोको आंदोलन,
ऑल इंडिया संविधान आर्मी तर्फे मुंबई दादर येथे विविध प्रमुख मागण्यांसाठी राज्यव्यापी आक्रोश रेल रोको आंदोलन,
पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
जन सुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे, कामगार विरोधी सर्वच खाजगीकरण रद्द करा, दादर चैत्यभूमीचे नामांतर झालेच पाहिजे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, भुसावळ येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर देखरेख समिती संविधान भवन भिमालय येथे संविधान निर्माते परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सत्तर वर्षांपूर्वीचा असल्याने आम्हाला ही जागा मिळालीच पाहिजे, छत्रपती संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्याला अटक झालीच पाहिजे अशा प्रमुख मागण्यांसाठी
ऑल इंडिया संविधान आर्मी तर्फे 15 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई दादर रेल्वे स्टेशन येथे दुपारी 2 वाजता हातात तिरंगा आणि संविधान घेऊन राज्यव्यापी आक्रोश रेल रोको आंदोलन होणार
आहे अशी माहिती ऑल इंडिया संविधान आर्मी चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष जगन भाई सोनवणे यांच्या नेतृत्वात आंदोलन होणार आहे, पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबईमधील महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्षांना अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष डॉ रामदास ताटे यांच्या वतीने करण्यात येत आहे,
Comments
Post a Comment