अंमली पदार्थ मुक्त गणेशोत्सव २०२४' या उपक्रमांसाठी पीडीईएच्या इंग्लिश मीडियम, आकुर्डी शाळेचा आणि विद्यार्थ्यांचा गौरव

अंमली पदार्थ मुक्त गणेशोत्सव २०२४' या उपक्रमांसाठी पीडीईएच्या इंग्लिश मीडियम, आकुर्डी शाळेचा आणि विद्यार्थ्यांचा  गौरव

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज

पुणे,आकुर्डी (ता : २३): पीडीईएच्या आकुर्डी येथील इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजला पुणे येथील भोई प्रतिष्ठानच्या वतीने, 'युवा केंद्रित सामाजिक अभियाना' मधील महत्त्वपूर्ण  योगदानाबद्दल, 'सन्मानचिन्ह' प्रदान करून गौरवण्यात आले.
राज्यसभा खासदार, डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते हा सन्मान शाळेच्या प्राचार्या प्रिती दबडे यांना प्रदान करण्यात आला. डॉ. कुलकर्णी यांनी तरुणांना अंमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी शाळेने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि या कार्यक्रमाचे नेतृत्व करणाऱ्या शिक्षिका शिल्पा बुक्तर आणि सुनीता रासकर यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनाबद्दल प्रशंसा करण्यात आली .
 शाळेच्या सन्मानासोबतच, दोन विद्यार्थिनींचा त्यांच्या विशेष कार्याबाबत गौरव करण्यात आला. इयत्ता ६ वी मधील ईश्वरी मोरे हिला तिच्या अप्रतिम चित्रासाठी, तर इयत्ता ८ वी मधील दर्शनी दंडगव्हाळ हिला तिच्या उत्कृष्ट निबंधासाठी सन्मानित करण्यात आले.
शाळा आणि विद्यार्थी यांच्या विशेष प्रतिभेची दखल घेणारे हे पुरस्कार म्हणजे सुदृढ व निरोगी समाज घडवण्यासाठी मिळणारी प्रेरणा ठरते व त्यामुळे अशा उपक्रमांना महत्वाचे स्थान प्राप्त होते.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न