नारळी पौर्णिमेनिमित्त श्री येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी – दहीहंडी फोडण्याचा मान बोधले कुटुंबाकडे

नारळी पौर्णिमेनिमित्त श्री येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी – दहीहंडी फोडण्याचा मान बोधले कुटुंबाकडे

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 

येरमाळा प्रतिनिधी नितीन बारकुल

धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथील प्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र श्री येडेश्वरी देवी ची नारळी पौर्णिमेनिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी झाली. श्री येडेश्वरी देवीची वर्षात दोनदा चैत्र पौर्णिमा व श्रावण महिन्यातील पौर्णिमेनिमित्त यात्रा भरते या निमित्त मंदिर परिसर भक्तिरसाने न्हावून निघाला होता.
आबाजी पाटील यांचे वंशज श्रावण महिन्यातील पौर्णिमेनिमित्त परंपरेनुसार सपत्याचे आयोजन करतात पौर्णिमेच्या आदल्या दिवशी श्री येडेश्वरी देवीची पालखी पाटील वाड्यात येते,
आज पौर्णिमेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर पाटील वाड्यात गावातील नागरिकांनी सकाळपासून पुरणपोळीचा नैवेद्य, नारळ, फुले अर्पण करण्यात आले. देवीच्या दर्शनासाठी आसपासच्या गावांसह दूरदूरहून आलेल्या भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिर फुलांनी व विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते.
या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम. दहीहंडी फोडण्याचा मान गावातील बोधले कुटुंबाकडे असतो. मोठ्या जल्लोषात आणि “आई राजा उदो उदो” च्या घोषात दहीहंडी फोडण्यात आली.
देवीचे मानकरी म्हणून दोन्ही पाटील परिवार विशेषत्वाने उपस्थित होते. तसेच, पालखीचे खांदेकरी, गावकरी, महिला मंडळे, कीर्तनकार, टाळकरी तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंदिर व्यवस्थापन समितीने भाविकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची व पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेसाठी विशेष बंदोबस्त ठेवला होता.
श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने भरलेल्या या दिवशी श्री येडेश्वरी देवीच्या चरणी नारळ अर्पण करून भाविकांनी आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीची व कल्याणाची प्रार्थना केली. संपूर्ण गाव भक्तिरसाने न्हावून निघाले होते.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न