पीडीईए इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, आकुर्डी येथे वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
पीडीईए इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, आकुर्डी येथे वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
पिंपरी-चिंचवड (दि. १५ ऑक्टोबर) —
भारताचे मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि ज्ञानाच्या दिशेने प्रेरित करणे हे आहे.
पीडीईए इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, आकुर्डी येथे हा दिवस अत्यंत आकर्षक पद्धतीने साजरा करण्यात आला.
इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या क्रीडांगणात बिंदी आकारात बसवून सामूहिक वाचनाचे आयोजन करण्यात आले. मुलांच्या हातात विविध मराठी आणि इंग्रजी गोष्टींची पुस्तके होती. शाळेत त्या क्षणी अक्षरशः “वाचनाचा उत्सव” रंगला होता.
या उपक्रमाची संकल्पना प्राचार्या प्रीती दबडे यांनी मांडली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहशिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि कार्यक्रम यशस्वी केला.
प्राचार्या दबडे म्हणाल्या
कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी ‘दररोज थोडे वाचा – आयुष्यभर शिका!’ या घोषवाक्याने प्रेरणा दिन अधिक अर्थपूर्ण केला.
वाचन प्रेरणा दिनाने मुलांच्या मनात ज्ञानाची नवी ज्योत प्रज्वलित केली!

Comments
Post a Comment