वार्षिक क्रीडा दिन जल्लोषात साजरा : लहानग्यांनी सादर केले रंगतदार नृत्य



वार्षिक क्रीडा दिन जल्लोषात साजरा : लहानग्यांनी सादर केले रंगतदार नृत्याविष्कार


पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 

आकुर्डी (20 नोव्हेंबर) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, आकुर्डी येथे वार्षिक क्रीडा दिन रंगतदार आणि उत्साहात साजरा झाला. मैदानावर लहानग्या खेळाडूंच्या कौशल्याची, एकतेची आणि देशभक्तीची अनोखी झलक पाहायला मिळाली.

कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक पंच मनीषा जाधव प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पारंपरिक पद्धतीने मशाल प्रज्वलन करून कार्यक्रमाची भव्य सुरुवात करण्यात आली.

शिशुवर्ग व बालवर्गातील चिमुकल्यांनी नृत्यातून एकतेचा सुंदर संदेश दिला, तर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी छोटे मनोरे तयार करून शारीरिक सामर्थ्य दाखवून दिले. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला शारीरिक क्षमतेवर आधारित नृत्याविष्कार विशेष आकर्षण ठरला.

तिसरी व चौथीतील विद्यार्थ्यांनी देशभक्ती, योग व शिस्त यांचे महत्त्व सांगणारा मनमोहक नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. रंगीबेरंगी रिबन, रिंग्स, पोम्पॉमच्या सहाय्याने मुलांनी केलेली सजावट कार्यक्रमात अधिकच तेज फुलवणारी ठरली.

पालक आणि पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कला, कौशल्य आणि आत्मविश्वासाचे भरभरून कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्या प्रीती दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

विद्यालयातील क्रीडा दिनाने विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला नवा उजाळा देत, उत्साहाने भरलेला आनंदसोहळा सर्वांच्या मनात कायमचा कोरला गेला.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न