पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्युनिअर कॉलेज,आकुर्डीकडून 'नीड फाउंडेशनच्या' माध्यमातून गरजूंना मदतीचा हात
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्युनिअर कॉलेज,आकुर्डीकडून 'नीड फाउंडेशनच्या' माध्यमातून गरजूंना मदतीचा हात
पुणे, आकुर्डी, (ता.२२) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्युनिअर कॉलेज,आकुर्डीकडून नेहमीच समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य दिले जाते. आजवर गरिबांना दिवाळी फराळ, आश्रमांमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप इत्यादी उपक्रम राबवण्यात आले होते. त्याप्रमाणेच आजदेखील गरीब गरजूंना कपडे भेट देण्यात आले. त्यामध्ये थंडीसाठी उबदार कपडे व दैनंदिन कपड्यांचा समावेश होता. सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत कपडे विद्यालयांमध्ये जमा केले. विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे यांच्याहस्ते सर्व कपडे 'नीड फाउंडेशनला' श्री.व सौ सारंग देशपांडे यांच्यामार्फत देण्यात आले. समाजाचा एक घटक म्हणून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, हे जीवनमूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजावे या हेतूने या उपक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
Comments
Post a Comment