वैद्यकीय मदत कक्षाच्या पाठपुराव्याला यशजिल्हा प्रमुख उमेश सोनवणे यांच्या प्रयत्नांना मोठे फळमाधव तिडके यांना मिळाली तब्बल २ लाख २५ हजारांची मदत
वैद्यकीय मदत कक्षाच्या पाठपुराव्याला यश
जिल्हा प्रमुख उमेश सोनवणे यांच्या प्रयत्नांना मोठे फळ
पुज्य नगरी ऑनलाईन म्यूज
परंडा (प्रतिनिधी) –
शिवसेना धाराशिव वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आणखी एका रुग्णाला जीवनदान! जिल्हा प्रमुख उमेश सोनवणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे परंडा येथील माधव तिडके यांना उपचारांसाठी तब्बल २ लाख २५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे.
माधव तिडके यांना अंधारे हॉस्पिटल, बार्शी येथे अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. त्याची माहिती मिळताच जिल्हा प्रमुख उमेश सोनवणे यांनी तातडीने कक्ष प्रमुख मंगेश जी चिवटे यांच्याशी संपर्क साधला आणि मदत मिळवण्यासाठी पुढाकार घेतला.
सोनवणे यांच्या पाठपुराव्यामुळे महत्मा फुले जनआरोग्य योजनेतून २लाख २५ हजार रुपयांची वैद्यकीय मदत मंजूर झाली.
या मोठ्या मदतीमुळे तिडके यांच्या कुटुंबीयांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी विशेषतः पुढील मान्यवरांचे आभार व्यक्त केले—
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, वैद्यकीय सहायता प्रमुख मंगेश चिवटे, कक्ष प्रमुख रामहरी राऊत, राज्य संपर्क प्रमुख गणपती कांबळे, तसेच जिल्हाप्रमुख उमेश सोनवणे व संपूर्ण शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष टीम.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या तत्पर कार्यामुळे अनेक गरजू रुग्णांना दिलासा मिळत असून समाजातून याबाबत कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment