एलिमेंटरी व इंटरमिजिएट शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेमध्ये पीडीईएच्या इंग्लिश मीडियम स्कूल, आकुर्डीचा शंभर टक्के निकाल

एलिमेंटरी व इंटरमिजिएट शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेमध्ये पीडीईएच्या इंग्लिश मीडियम स्कूल, आकुर्डीचा शंभर टक्के निकाल

पुज्य नगरी न्यूज 

पुणे, आकुर्डी : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्युनिअर कॉलेज,आकुर्डीने शासकीय एलिमेंट्री व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा २०२५–२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत शाळेचा १००℅ निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 
एलिमेंट्री चित्रकला परीक्षेत एकूण ३२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 'अ' श्रेणीमध्ये २,'ब' श्रेणीमध्ये ७ आणि 'क' श्रेणीमध्ये २३ तसेच इंटरमिजिएट चित्रकला स्पर्धेत एकूण २१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी,'अ'श्रेणीमध्ये १,'ब' श्रेणीमध्ये १ व 'क' श्रेणीमध्ये १९ असे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 
या यशामागे मार्गदर्शक शिक्षिका सौ. विद्या गजरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. प्रिती दबडे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला.
या घवघवीत यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षकवर्ग व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, भविष्यातही अशाच यशाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Comments

Popular posts from this blog

सोनारी येथील भैरवनाथ शुगर गाळपासाठी सज्ज चेअरमन आनिल सावंत,

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात परंड्यात मेडिकल दुकाने बंद

अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करा; अन्यथा आंदोलन लहुजी शक्ती सेनेचा इशारा ,