इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल' आकुर्डी, पुणे येथे 'साहित्यसंपदा' आयोजित, "गोष्टी तुमच्या आमच्या" ऑनलाईन कथा वाचन महोत्स संपन्न
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल' आकुर्डी, पुणे येथे 'साहित्यसंपदा' आयोजित, "गोष्टी तुमच्या आमच्या" ऑनलाईन कथा वाचन महोत्सव संपन्न
पुणे, आकुर्डी (ता.) : मराठी भाषा पंधरवड्याचे औचित्य साधून साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनवडे यांच्या संकल्पनेतून साहित्यसंपदा आयोजित, "गोष्टी तुमच्या आमच्या" ऑनलाइन कथा वाचत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक २४.०१.२०२६ ते २६.०१.२०२६ या काळात घेण्यात आलेल्या वाचन सोहळ्याचे उद्घाटन फेसबुक लाईव्ह पद्धतीने पार पडले .
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, आकुर्डी या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या वाचन व भाषिक कौशल्याच्या विकासासाठी या कथावाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी गोष्टी प्रभावी सादरीकरणातून मांडल्या. त्यांच्या आवाजातील चढ-उतार, भावभावना व आत्मविश्वास पूर्ण सादरीकरणामुळे कार्यक्रम अतिशय रंगतदार झाला.
विद्यार्थ्यांना कथावाचन सादर करण्यासाठी शाळेच्या प्राचार्या प्रिती दबडे यांनी मार्गदर्शन केले व सुंदर कथा सादरीकरणानंतर विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याचे मत शाळेच्या प्राचार्या यांनी व्यक्त केले. इयत्ता चौथीतील खालील विद्यार्थी स्पर्धेमध्ये सहभागी झाले व त्यांना डिजिटल सर्टिफिकेट देवून गौरविण्यात आले.
श्रुती विनोद कुमार कोल्हे, श्रेया सिद्धेश नाईक, अंजली सुनिल साळुंखे, रुद्र संदेश पालकर
Comments
Post a Comment