कथावाचन महोत्सवामध्ये पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डीचा उत्स्फूर्त सहभाग

' कथावाचन महोत्सवामध्ये पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डीचा उत्स्फूर्त सहभाग 

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 

पुणे, आकुर्डी (ता.२४) : मराठी भाषा पंधरवड्याचे औचित्य साधून साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे यांच्या संकल्पनेतून साहित्यसंपदा आयोजित 'गोष्टी तुमच्या-आमच्या' ऑनलाईन 'कथावाचन महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले होते . दिनांक २४-०१-२६ ते २६-०१-२६ या काळात घेण्यात आलेल्या वाचन सोहळ्याचे उदघाटन फेसबुक लाईव्ह पद्धतीने पार पडले.
   शाब्दिक स्वागत आणि प्रास्ताविक सादर करताना स्मिता हर्डीकर यांनी साहित्यसंपदातर्फे पार पडलेल्या उपक्रमांची ओळख करून दिली. निमंत्रित प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली. माननीय राजन लाखे (बकुळगंधकार) जेष्ठ साहित्यिक, अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा यांनी कथालेखनाचे  स्वरूप उलगडून दाखविले. तसेच वाचन चळवळीचे महत्व
त्यांनी उदाहरणासहित उलगडून दाखविले. माननीय डॉ.सोनाली लोहार 
स्तंभ लेखिका, कथाकार, कवयित्री लाईव्ह, व्हॉइस थेरपिस्ट यांनी कथावाचन सोहळ्यास शुभेच्छा देताना कथेचे अभिवाचन कसे करावे याचे मार्गदर्शन केले. त्यांच्या 'साळींदर' कथेचे वाचन सुद्धा पार पडले.
कार्यवाहक अपेक्षा बिडकर, किरण बोरकर, अश्विनी बोलके यांच्या कथावाचनाने सोहळ्यास सुरवात झाली.
या कथावाचन महोत्सवाचे वैशिष्टय म्हणजे महाराष्ट्रातील विविध भागांतील संस्थांनी यात सहभाग नोंदविला आहे.
शुभंकरोति साहित्य मंच, मुंबई, साहित्यिक सखी ग्रुप, उदगीर, अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान, कल्याण, शब्दशिल्प कलाविष्कार संघ, मुंबई, अभिनव फाउंडेशन,भडगाव 
डिजिटल पार्टनर – मनोमय मीडिया व इतर संस्थांच्या माध्यमातून उपक्रम पार पडत आहे. 
     या कार्यक्रमात पुणे येथील पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज,आकुर्डी या विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती प्रवीणकुमार दबडे यांनी कथावाचनामध्ये सहभाग नोंदवला. तसेच शाळेतील इतर विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाच्या आयोजनात विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कथावाचन  महोत्सवात सहभागी विद्यार्थी अनन्या खाडे, मानसी कांबळे, आर्या ढोके, मानवी घाडगे, ईश्वरी मोरे, यशस्वी वडके, अन्वी खोत, भुवनेश्वरी गांगुर्डे व प्राची बडक या सर्व विद्यार्थ्यांनी कथावाचन केले. त्यांच्या सहभागाबद्दल आणि सुंदर सादरीकरणाबद्दल त्यांना साहित्यसंपदा संस्थेतर्फे सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक वैभव धनवडे सरांनी मनापासून कौतुक केले. 
या कार्यक्रमाचे डिजिटल पार्टनर म्हणून मनोमय मीडियाने काम पाहिले तर युवासंपदा, संस्कारसंपदा आणि साहित्यसंपदा प्रकाशनचेही मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांमध्ये 'वाचन संस्कृती' रुजवण्यासाठी राबवलेला हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.

Comments

Popular posts from this blog

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल