सेकंडरी स्कूल व ज्युनिअर कॉलेज आकुर्डीच्या विद्यार्थ्यांचे स्काऊट-गाईड राज्य पुरस्कारामध्ये यश

 सेकंडरी स्कूल व ज्युनिअर कॉलेज आकुर्डीच्या  विद्यार्थ्यांचे स्काऊट-गाईड राज्य पुरस्कारामध्ये यश

पुज्य नागरी ऑनलाईन न्यूज 

पुणे, आकुर्डी (ता.) : महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स राज्य कार्यालयाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील शाळांकरिता राज्य पुरस्कार राज्यस्तरीय चाचणी शिबिराचे आयोजन राज्य प्रशिक्षण केंद्र, रामबाग, भोर, जिल्हा पुणे येथे करण्यात आले होते. दिनांक १६ ते १९ जानेवारी दरम्यान गाईड्स व २० ते २३ जानेवारी, २०२६ दरम्यान स्काऊट्स राज्य पुरस्कार चाचणी शिबिर संपन्न झाले. सदर राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सर्व शाखांचा सहभाग होता. 

या शिबिरामध्ये एकूण २१५ गाईड्स व १६५ स्काऊट्सने उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला होता. शिबिर प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्काउट्स व गाईड्सने रामधून, बी. पी. सिक्स व्यायाम प्रकार, अभ्यासक्रमावर आधारित लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा देत तंबू उभारणी करणे, स्वयंपाक करणे, विविध गॅझेट बनवून नवनिर्मितीचा आनंद घेत राज्य पुरस्कार चाचणीत यशस्वी कामगिरी केली. या राज्यस्तरीय चाचणी परीक्षेत पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु. कॉलेज, आकुर्डीच्या स्काऊट्स अविष्कार शिंदे, सिद्धेश पाटील, शिवराज गाडे, नैतिक रौंदाळे, मोहित चौरसिया यांनी तसेच गाईड्स वैष्णवी चासकर, कुसुम चौधरी, स्वरांजली लुगडे, कौशल्या वग्गी यांनी सहभाग घेतला होता. 

सर्व विद्यार्थ्यांनी या राज्यस्तरीय चाचणी शिबिरात उत्कृष्टपणे कामगिरी केली व उत्तीर्ण होत राज्य पुरस्कार प्राप्त केला. या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी यांनी विद्यालयाचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रिती दबडे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांच्याकडूनही यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे या  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या व गुणवत्तेच्या दृष्टीने नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमासाठी प्रोत्साहन दिले. सहभागी विद्यार्थ्यांना स्काऊट मास्टर मंदार देसाई व गाईड युनिट लीडर ज्योती बोंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल