पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, आकुर्डीमध्ये 'लायन्स क्लब'च्या वतीने 'पॅरेंटिंग मास्टरक्लास' चर्चासत्र व पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, आकुर्डीमध्ये 'लायन्स क्लब'च्या वतीने 'पॅरेंटिंग मास्टरक्लास' चर्चासत्र व पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
पुणे, आकुर्डी (ता.१६) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज,आकुर्डीमध्ये 'पॅरेंटिंग मास्टर क्लास' या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लायन्स क्लबच्या संस्थापक लायन प्रीती बोंडे, प्रेसिडेंट लायन विद्या वकारे, सेक्रेटरी डॉ.लायन शितल मोरे, ट्रेझरर डॉ. लायन प्रज्ञा देवकाते, लायन जयंत बोंडे, लायन दादाराव फाटे, शिक्षणतज्ञ डॉ. संघर्ष म्हैसाने व संपूर्ण लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्टार टीमचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीने प्राचार्या प्रिती दबडे यांच्या हस्ते सत्कार व स्वागत करण्यात आले.
'पेरेंटिंग मास्टरक्लास' या सत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या व त्याबाबतीत पालकांची योग्य भूमिका, विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने, आदर्श पालकत्व कसे असावे, मुलांच्या वर्तनामागील वैज्ञानिक कारणे याबाबतीतले सविस्तर मार्गदर्शन शिक्षणतज्ञ डॉ.संघर्ष म्हैसाने यांनी पालक व विद्यार्थ्यांना केले. या सत्रामध्ये पालक व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे संवादात्मक चर्चा केली व शंकांचे निरसन करवून घेतले.
तसेच लायन्स क्लबच्या वतीने इंटरनॅशनल पोस्टर बनवणे स्पर्धेचे आयोजन सप्टेंबर महिन्यात करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण देखील पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये आस्था अमर राठोड, श्रेया संतोष लाटकर, तनिष्का कमलेश जैसवार, नंदिनी कन्हैया गुप्ता, रक्षिता मांगीलाल चौधरी तपस्या नंदकिशोर फलके या विद्यार्थ्यीनींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे यांना देखील लायन्स क्लबच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
Comments
Post a Comment