अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 'चला चिऊ वाचवू' या अभियानांतर्गत विविध स्पर्धा संपन्न

अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 'चला चिऊ वाचवू' या अभियानांतर्गत विविध स्पर्धा संपन्न 

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज़
 
अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 'चला चिऊ वाचवू' या अभियानांतर्गत विविध वयोगटांसाठी चित्रकला' रांगोळी, कथा लेखन, कविता लेखन, इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा 'चिमणी पुरस्कार वितरण सोहळा' रविवार दिनांक 15 मार्च २०२६ रोजी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क 'चिंचवड' पुणे येथे पार पडला. या सोहळ्यासाठी माननीय श्री. प्रवीण तुपे, संस्थापक, संचालक पिंपरी चिंचवड मुख्य अतिथी म्हणून लाभले. डॉ. श्रद्धा खंपरिया मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी चिंचवड सायन्स पार्क यांची सुद्धा विशेष उपस्थिती होती. तसेच माननीय श्री. पियुष सेकसरिया यांचे 'द  व्हेन अंड व्हाय ऑफ वर्ड्स क्रॅशिंग इंटू विंडोज' या विषयावर विशेष व्याख्यान झाले.

'चला चिऊ वाचवू' या अभियानांतर्गत दहा वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, आकुर्डी शाळेने देखील सहभाग घेतला होता. इयत्ता दुसरीमधील यश वाडेकर या विद्यार्थ्याला या वयोगटामध्ये उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.  तसेच विद्यालयातील इतर ५० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. 
या स्पर्धेत विद्यार्थ्यांना सहभाग घेण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय प्रीती दबडे यांनी प्रोत्साहन दिले व मार्गदर्शन केले.

Comments

Popular posts from this blog

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल