मायेचा एक घास: जवानांसाठी शुभेच्छापत्र स्पर्धेत पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आकुर्डी शाळेचा गौरव, 84 विद्यार्थ्यांचा सहभाग
*मायेचा एक घास: जवानांसाठी शुभेच्छापत्र स्पर्धेत पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आकुर्डी शाळेचा गौरव, 84 विद्यार्थ्यांचा सहभाग
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
आकुर्डी आधार सोशल ट्रस्टने आयोजित केलेल्या “मायेचा एक घास भारतीय जवानांसाठी” या उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय ग्रीटिंग कार्ड स्पर्धेत पीडीईएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, आकुर्डीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. हा कार्यक्रम १८ एप्रिल २०२६ रोजी संपन्न झाला.
या स्पर्धेत शाळेतील ८४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाळेचा विशेष गौरव करण्यात आला. इयत्ता सातवीतील विद्यार्थी यशराज शरद पोटले याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
कार्यक्रमास बीएसएफ असिस्टंट कमांडंट प्रतिक वशिष्ठ, राष्ट्रसेवा दल संचालित शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शिवाजी खाडेकर व नगरसेविका जयश्रीताई भूमकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.
Comments
Post a Comment