कैवल्य रमेश वैद्य गुरुजी यांना “डॉ.” पदवी प्रदान
परंडा येथील कैवल्य रमेश वैद्य गुरुजी यांना “डॉ.” पदवी प्रदान
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
नवी दिल्ली (प्रतिनिधी):
पं. दीनदयाल उपाध्याय हिन्दी विद्यापीठ, वृंदावन धाम (मथुरा, उ.प्र.) यांच्या तर्फे आयोजित “राष्ट्रीय हिन्दी संगोष्ठी एवं सम्मान समारोह” या कार्यक्रमात आज परंडा येथिल कैवल्य वैद्य गुरुजी यांना “डॉ.” (Doctorate – विद्यावाचस्पती) पदवी प्रदान करण्यात आली.
हा कार्यक्रम रविवार, दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या वेळेत होटल रेडिसन ब्लू, पश्चिम विहार, नवी दिल्ली येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्रा. सुधीर कुमार आर्य (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली), अध्यक्षस्थानी मा. डॉ. इंदु भूषण मिश्रा (कुलपती, पं. दीनदयाल उपाध्याय हिन्दी विद्यापीठ) तसेच प्रमुख वक्ते म्हणून मा. डॉ. रेखा चौहान (शिक्षण संचालनालय, नवी दिल्ली) यांची उपस्थिती लाभली. याशिवाय शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक विद्वान उपस्थित होते.
कैवल्य वैद्य गुरुजी हे गेल्या चार पिढ्यांपासून चालत आलेल्या पौरोहित्य परंपरेचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या कुटुंबात आजोबा, वडील आणि पूर्वजांकडून चालत आलेली संस्कार, श्रद्धा आणि शास्त्राधारित सेवा त्यांनी आजही तितक्याच निष्ठेने पुढे नेली आहे.
पौरोहित्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल तसेच समाजात धार्मिक व सांस्कृतिक मूल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या सन्मानाबद्दल बोलताना कैवल्य वैद्य गुरुजी म्हणाले,
Comments
Post a Comment