परंड्यात नव्या सीए कार्यालयाचा शुभारंभ
परंड्यात नव्या सीए कार्यालयाचा शुभारंभ; तरुण व्यावसायिकाला मोठा प्रतिसाद
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
परांडा :( ) शहराच्या व्यावसायिक क्षेत्रात आणखी एक नवे पाऊल पडत, चार्टर्ड अकाउंटंट आवेज शेख यांच्या कार्यालयाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. परंडा तालुक्यातील वडनेर येथील रहिवासी आणि बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अब्दुल शेख यांचे सुपुत्र असलेल्या आवेज शेख यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात परंडा शहरातून केली आहे.
या नव्या सीए कार्यालयाचे उद्घाटन शिवाजी शिक्षण प्रसार मंडळाचे जॉईंट सेक्रेटरी अरुण देबडवारकर, परंडा शहराचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर तसेच सुप्रसिद्ध अडत व्यापारी बाबा बहिरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला परंडा शहरातील व्यापारी, नगरसेवक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आवेज शेख यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विश्वास व्यक्त केला.
विशेष म्हणजे, आवेज शेख हे परंडा नगर परिषदेचे नगरसेवक वाजीद दखनी यांचे भाचे असून, त्यांच्या या यशामुळे स्थानिक पातळीवर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी शहरातील व्यापारी प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते ,
Comments
Post a Comment