बालीकेवर अत्याचार करणाऱ्या अरोपीला फाशी देण्याची मागणी

नसरापूर अत्याचार प्रकरण पेटलं! आरोपीला फाशीची मागणी 
वकिलांनी केस न घेण्याचं आवाहन

पुणे (प्रतिनिधी शंकर जोग ) 
 भोर तालुक्यातील नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि खुनाच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून, संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या वतीने पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. काळूराम भुजबळ यांना निवेदन देत, “आरोपीचे वकीलपत्र कोणत्याही वकिलांनी स्वीकारू नये” असे आवाहन करण्यात आले. या घटनेमुळे समाजात तीव्र संताप असून, आरोपीला लवकरात लवकर मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली.

 या निवेदनावेळी शिवसेनेचे पुणे शहर समन्वयक शंकर संगम, श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे शहर प्रमुख रोहित उर्फ बापू कसबेकर, शिक्षक सेनेचे जिल्हा प्रमुख अनिल गडकरी, उपशहर प्रमुख सुनील जाधव, संजय डोंगरे, शहर संघटक अनिल बटाने, निलेश जगताप, मागासवर्गीय शहर प्रमुख महेंद्र गायकवाड यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निर्दयी कृत्याला कडक शिक्षा मिळालीच पाहिजे” — असा एकमुखी सूर व्यक्त करत, या प्रकरणात जलदगतीने न्याय मिळावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
नसरापूर येथील या धक्कादायक घटनेने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आता शासन व न्यायव्यवस्था काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

सोनारी येथील भैरवनाथ शुगर गाळपासाठी सज्ज चेअरमन आनिल सावंत,